एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठव्यापार-उद्योगLadki Bahin Yojana : कोणत्या लाडक्या बहिणींना 500 रुपये अन् कुणाला 1500 रुपये मिळणार? जाणून घ्या नियम, एप्रिलचा हप्ता कधी मिळणार?
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची रक्कम एकत्र देण्यात आली होती.
By : युवराज जाधव|Updated at : 18 Apr 2025 05:21 PM (IST)
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Source : Freepik AI
मुंबई : महाराष्ट्र सरकारनं जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत जुलै 2024 ते मार्च 2024 या कालावधीत 9 महिन्यांचे पैसे मिळाले आहेत. राज्याच्या महिला व बालविकास विभागातर्फे ही योजना चालवली जाते. या योजनेद्वारे महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. आता राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे. राज्य सरकार अक्षय्य तृतीयेला महिलांच्या खात्यात एप्रिल महिन्याचे 1500 रुपये पाठवणार असल्याची माहिती आहे. याच दरम्यान काही महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून केवळ 500 रुपये दिले जातील अशी बातमी पुढं आली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून लाभ मिळतो. त्या महिलांना दरमहा 1500 ऐवजी 500 रुपये देण्यात आले आहेत.
निकष जुनेच कोणताही बदल नाही
राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करताना डीबीटी द्वारे कमाल 18000 रुपये महिलांच्या खात्यात पाठवण्याचे निर्णय घेतला होता. नमो शेतकरी महासन्मान निधी आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेतून दरवर्षी प्रत्येकी सहा हजार रुपये दिले जातात. म्हणजेच एखादी महिला या दोन्ही योजनांची लाभार्थी असेल तर तिला एका वर्षामध्ये 12000 रुपये मिळतील. उरलेल्या सहा हजार रुपयांची रक्कम प्रत्येकी 500 रुपयांप्रमाणं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून त्या महिलांना दिले जाणार आहेत. महाराष्ट्र सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे दोन शास निर्णय काढले होते. त्याला अनुसरुनचं महिलांना 500 रुपये दिले जाणार आहेत. निकषात कोणताही बदल करण्यात आलेला नसून योजनेच्या जीआरमध्ये ज्या अटी होत्या त्यांची अंमलबजावणी केली जात आहे.
किती महिलांना 500 रुपये मिळणार?
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काही दिवसांपूर्वी या प्रकरणी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारची भूमिका मांडली होती. त्यामध्ये त्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 500 रुपये देण्यात येत आहेत अशी घोषणा केली. आदिती तटकरे यांच्या ट्विटनुसार या महिलांची संख्या 774148 इतकी आहे. या महिलांना लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये मिळतील. उर्वरित पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार लाडकी बहीण योजनेतून महिलांना आर्थिक मदत दिली जाते.
हेदेखील वाचा
Published at : 18 Apr 2025 05:21 PM (IST)
Tags :
Business News Ladki Bahin Yojana Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
#IPL2025#MIvsCSK#Devendra Fadnavis#Dhananjay Munde#Beed#Cricket News#Maharashtra Vidhan Sabha Session#Maharashtra Assembly Election2024#MVAvsMahayuti#Sharad Pawar#Chhatrapati Shivaji Maharaj#Maharashtra Politics#Marathi News#Mumbai News#Pune News#Uddhav Thackeray# Massajog#Santosh Deshmukh
व्हिडीओ
फोटो गॅलरी
ट्रेडिंग पर्याय
शिवानी दाणी वखरे
Share Market : क्या करे क्या ना करे, ये कैसी मुश्कील हाय!
Opinion